News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

मिठाई खाताय, सावधान! पोलिसांकडून बुरशी लागलेली 250 किलो मिठाई जप्त, कारवाईसाठी एफडीएकडे वेळ नाही

बुरशी लागलेली मिठाई रिसायकल करून बाजारात विकली जात आसल्याचे पोलिसांना आढळले आहे. याप्रकरणी वसईतल्या एका गोदामावर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामध्ये 250 किलो मिठाई जप्त करण्यात आली आहे.

FOLLOW US: 
Share:
वसई : बुरशी लागलेली मिठाई रिसायकल करून बाजारात विकली जात आसल्याचे पोलिसांना आढळले आहे. याप्रकरणी वसईतल्या एका गोदामावर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामध्ये 250 किलो मिठाई जप्त करण्यात आली आहे. एफडीएने (अन्न व औषध प्रशासन) पुढील कारवाई करणे आवश्यक आहे. परंतु एफडीएला पुढील कारवाई करण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे वसई-विरार परिसरात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. काही दिवसांपूर्वी वसईत बनावट पनीरच्या कारखान्यांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता वसईत बुरशी लागलेली मिठाई पुन्हा रिसायकल करुन विकली जात असल्याचे आढळले आहे. नायगांव पूर्वेकडील वाकीपाडा येथील श्री कृष्णा मंगल डेअरी अँड स्वीट मार्टच्या कारखान्यावर छापा मारला असता अत्यंत धक्कादायक घटना उघड झाली आहे. 100 किलोपेक्षा जास्त बुरशी लागलेली मिठाई या कारखान्यात आढळून आली आहे. या मिठाईत, बर्फीत घातक असं केमिकल हे मिसळले जात होते. केसर बर्फीचा स्वाद आणण्यासाठी साध्या बर्फीत लाल केमिकल वापरले जात होते. बुरशी लागलेली मिठाई एका मशीनद्वारे प्रक्रीया करून पुन्हा विक्रीसाठी उपलब्ध केली जात आहे. पोलिसांनी अशी 150 किलो मिठाई यावेळी जप्त केली आहे. श्री कृष्णा मंगल डेअरी अँड स्वीट मार्टच्या कारखान्यात लाडू, पेढे, मलई बर्फी, अंजीर बर्फी, मिल्क केक, मावा, काजू बर्फी, बनवली जाते. मावा बनविण्यासाठी गुजरात गोल्ड, प्रिमियम गोल्ड पावडर मिसळली जात होती. तसेच या डेअरीत केमिकलच्या बाटल्यादेखील सापडल्या आहेत. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाने करायला हवी होती. परंतु अशा प्रकारच्या कारवाया करताना ते दिसत नाहीत. ही कारवाई पोलिसांनी केल्यानंतर पुढील कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाने करणे आवश्यक होते. परंतु एफडीएच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे (अन्न व औषध प्रशासन विभाग) आज वेळ नसल्याने ते मंगळवारी कारवाईसाठी येणार आहेत : मल्हार थोरात (पोलीस उपनिरीक्षक, पालघर विशेष पथक)
Published at : 18 Feb 2019 07:11 PM (IST) Tags: fda news in Marathi today\'s news in marathi marathi news today Vasai

आणखी महत्वाच्या बातम्या

Dhananjay Munde Resignation: मंत्रिपद गेलं, पण धनंजय मुंडेंना दिलासा देण्याची सरकारची तयारी, संतोष देशमुख प्रकरणात पुढे काय होणार?

Dhananjay Munde Resignation: मंत्रिपद गेलं, पण धनंजय मुंडेंना दिलासा देण्याची सरकारची तयारी, संतोष देशमुख प्रकरणात पुढे काय होणार?

Dhananjay Munde Resignation: संतोष देशमुख प्रकरणामुळे नव्हे तर 'या' कारणामुळे राजीनामा, धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Dhananjay Munde Resignation: संतोष देशमुख प्रकरणामुळे नव्हे तर 'या' कारणामुळे राजीनामा, धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Ajit Pawar : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्यानंतर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया; एका ओळीत विषय संपवला, म्हणाले...

Ajit Pawar : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्यानंतर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया; एका ओळीत विषय संपवला, म्हणाले...

Aaditya Thackeray: सुधारित चार्जशीट दाखल करा, धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, सरकार बरखास्त करा, आदित्य ठाकरेंच्या तीन मोठ्या मागण्या

Aaditya Thackeray: सुधारित चार्जशीट दाखल करा, धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, सरकार बरखास्त करा, आदित्य ठाकरेंच्या तीन मोठ्या मागण्या

Dhananjay Munde Resign: अखेर धनंजय मुंडेंनी दिला राजीनामा, पंकजा मुंडें मोजकेच बोलल्या, म्हणाल्या, 'मला पाहू द्या, मला काही...'

Dhananjay Munde Resign: अखेर धनंजय मुंडेंनी दिला राजीनामा, पंकजा मुंडें मोजकेच बोलल्या, म्हणाल्या, 'मला पाहू द्या, मला काही...'

टॉप न्यूज़

Dhananjay Munde Resignation : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पक्षातील इतर नेत्यांना होणार लाभ? भुजबळांच्या गळ्यात मंत्रि‍पदाची माळ? 'या' नेत्यांच्या नावाचीही चर्चा

Dhananjay Munde Resignation : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पक्षातील इतर नेत्यांना होणार लाभ? भुजबळांच्या गळ्यात मंत्रि‍पदाची माळ? 'या' नेत्यांच्या नावाचीही चर्चा

दहा वर्षात महाराष्ट्र सरकारमधील चार मंत्र्यांचा राजीनामा

दहा वर्षात महाराष्ट्र सरकारमधील चार मंत्र्यांचा राजीनामा

Karuna Sharma on Santosh Deshmukh Case : ती लघवी संतोष देशमुखांच्या तोंडावर नाही, शासन प्रशासनाच्या कारभारावर : करुणा शर्मा

Karuna Sharma on Santosh Deshmukh Case : ती लघवी संतोष देशमुखांच्या तोंडावर नाही, शासन प्रशासनाच्या कारभारावर : करुणा शर्मा

Dhananjay Munde Net Worth :धनंजय मुंडेंच्या ताफ्यात बुलेट ते मर्सिडीज बेन्झ, माजी मंत्र्यांकडे संपत्ती नेमकी किती?

Dhananjay Munde Net Worth :धनंजय मुंडेंच्या ताफ्यात बुलेट ते मर्सिडीज बेन्झ, माजी मंत्र्यांकडे संपत्ती नेमकी किती?